सार्थकाचा ऐसा काळ – संत निळोबाराय अभंग – ९४२
सार्थकाचा ऐसा काळ ।
केला अमंगळ मूढ जनीं ॥१॥
येऊनियां नरदेहासी ।
नेणें स्वहितासी आपुलिया ॥२॥
धिक् त्याचें झालें जिणें ।
विना स्मरणें श्रीहरिचिया ॥३॥
निळा म्हणे त्याची जोडी ।
अवघी कुळवाडी पापत्मक ॥४॥