सुखानंदाची राणीव – संत निळोबाराय अभंग – ९४१

सुखानंदाची राणीव – संत निळोबाराय अभंग – ९४१

सुखानंदाची राणीव ।
भागा आली फावली सर्व ॥१॥
घ्याल ते घ्या रे धणीवरी ।
असाल जे जे या अधिकारी ॥२॥
फुकासाठीं वोळोनी आलें ।
घरासी दैव हें चांगलें ॥३॥
निळा म्हणे उबग नका ।
मानूं अवघेहि ऐका ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुखानंदाची राणीव – संत निळोबाराय अभंग – ९४१