संत निळोबाराय अभंग

आमुचा जिवलग सांगती – संत निळोबाराय अभंग ९४

आमुचा जिवलग सांगती – संत निळोबाराय अभंग ९४


आमुचा जिवलग सांगती ।
जन्मोजन्मींचा श्रीपती ।
एकीसवें एकी बोलती ।
आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥
नाना परीच्या विनोदवार्ता ।
सांगाती बोलती अनंता ।
तुझेनि भाग्यें भाग्यवंता ।
म्हणती आम्ही संसारी ॥२॥
कृष्णा आत्मया सुखानंदा ।
परात्परा जी आनंदकंदा ।
नित्या अचिंत्या अभेधा ।
देवत्रयां तूं वंदय ॥३॥
ऐसा असोनियां आम्हां आरजा ।
खेळणें झालासी आजिच्या काजा ।
धन्य आम्हीही गरुडध्वजा ।
तुझे पादपध देखतों ॥४॥
आणखीही एक नवल थोर ।
परमात्मया तूं परात्पर ।
आम्हालागीं रुप साकार ।
आवडी ऐसेंचि धरियेलें ॥५॥
कृष्णा म्हणोनियां पाचारितां ।
वो म्हणोनियां येसी धावंतां ।
येरवी वेदाचियांही संमता ।
उरविसी रुप निर्धारिं ॥६॥
निळा म्हणे ऐशिया प्रेमें ।
अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमे ।
तैसेंचि जाणोनियां त्या परब्रहमें ।
पुरविले त्यांचे सोहळे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आमुचा जिवलग सांगती – संत निळोबाराय अभंग ९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *