संत आज्ञा सादवित – संत निळोबाराय अभंग – ९३९

संत आज्ञा सादवित – संत निळोबाराय अभंग – ९३९

संत आज्ञा सादवित ।
जातों सकळांचेंहि हित ॥१॥
नाईकोनी सोडाल ।
फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥
आम्ही उत्तीर्ण आपुलिया ।
उचिता ठेलों सांगोनियां ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
बोल न ठेवावा मागुता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत आज्ञा सादवित – संत निळोबाराय अभंग – ९३९