सहजचि घरींहूनियां यावें । विठठला पहावें रुक्मिणी ॥१॥ न लभेचि जो कां ब्रम्हादिकां । तो या लोकां दाखविला ॥२॥ भेटीचि घेतां वरावरी । सन्मानें करी गौरव ॥३॥ निळा म्हणे भाग्यवंत । करी सनाथ अनाथां ॥४॥