सर्पे मुखींच धरिलें विष – संत निळोबाराय अभंग – ९३७

सर्पे मुखींच धरिलें विष – संत निळोबाराय अभंग – ९३७

सर्पे मुखींच धरिलें विष ।
मानुनि पीयूष अत्यादरें ॥१॥
आणिका डंखुनी वधवी प्राणा ।
तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥२॥
नागवूनि भलियां संतोष मानी ।
कैसा तो पतनीं न पडेल सांगा ॥३॥
निळा म्हणे जें जोडिलें सायासें ।
तोचि तयाहि ऐसें भोगणें पुढें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्पे मुखींच धरिलें विष – संत निळोबाराय अभंग – ९३७