वचनींही नव्हे उणें – संत निळोबाराय अभंग – ९३५
वचनींही नव्हे उणें । तुकुनी पाहतां सुजाणें ॥१॥ झिजलें ना कुहिजलें । नित्य नवेंचि चांगलें ॥२॥ नलगे घालावी निशाणी । वारंवार क्षणक्षणीं ॥३॥ निळा म्हणे कोठें तरी । नेतां देश देशांतरीं ॥४॥