वचनींही नव्हे उणें – संत निळोबाराय अभंग – ९३५
वचनींही नव्हे उणें ।
तुकुनी पाहतां सुजाणें ॥१॥
झिजलें ना कुहिजलें ।
नित्य नवेंचि चांगलें ॥२॥
नलगे घालावी निशाणी ।
वारंवार क्षणक्षणीं ॥३॥
निळा म्हणे कोठें तरी ।
नेतां देश देशांतरीं ॥४॥
वचनींही नव्हे उणें – संत निळोबाराय अभंग – ९३५
वचनींही नव्हे उणें ।
तुकुनी पाहतां सुजाणें ॥१॥
झिजलें ना कुहिजलें ।
नित्य नवेंचि चांगलें ॥२॥
नलगे घालावी निशाणी ।
वारंवार क्षणक्षणीं ॥३॥
निळा म्हणे कोठें तरी ।
नेतां देश देशांतरीं ॥४॥