वर्माचाचि स्पर्श करी । क्षुद्र धरुनियां अंतरीं ॥१॥ न धरि पातकाचें भय । नेणें पुढें होईल काय ॥२॥ इच्छी सदा अभ्यंतरीं । परधन पराचिया नारी ॥३॥ निळा म्हणे भेटी । होतां सुकृताची आटी ॥४॥