वर्माचाचि स्पर्श करी – संत निळोबाराय अभंग – ९३३
वर्माचाचि स्पर्श करी ।
क्षुद्र धरुनियां अंतरीं ॥१॥
न धरि पातकाचें भय ।
नेणें पुढें होईल काय ॥२॥
इच्छी सदा अभ्यंतरीं ।
परधन पराचिया नारी ॥३॥
निळा म्हणे भेटी ।
होतां सुकृताची आटी ॥४॥
वर्माचाचि स्पर्श करी ।
क्षुद्र धरुनियां अंतरीं ॥१॥
न धरि पातकाचें भय ।
नेणें पुढें होईल काय ॥२॥
इच्छी सदा अभ्यंतरीं ।
परधन पराचिया नारी ॥३॥
निळा म्हणे भेटी ।
होतां सुकृताची आटी ॥४॥