लुगडया नांव चंद्रकळा ।
परी तो काळा रंग वरी ॥१॥
नांवा ऐसें कर्तृत्व नाहीं ।
तरी तें कायी नपुसंक ॥२॥
घोळण्या नांव लक्षुमण ।
करितें भर्जन लाहयांचें ॥३॥
निळा म्हणे घुसळिती रवी ।
परी ते न दावी प्रकाश ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.