लोहा लागतां सुवर्ण – संत निळोबाराय अभंग – ९३१
लोहा लागतां सुवर्ण ।
करावें हा स्वभावगुण ॥१॥
केंवि सांडवेल परिसा ।
जगदगुरु हा विठ्ठल तैसा ॥२॥
रत्ना अंगी रत्नकीळ ।
नव्हती भिन्न अग्निज्वाळ ॥३॥
निळा म्हणे सांडुनि जळा ।
सागर न निवडे वेग्ळा ॥४॥
लोहा लागतां सुवर्ण ।
करावें हा स्वभावगुण ॥१॥
केंवि सांडवेल परिसा ।
जगदगुरु हा विठ्ठल तैसा ॥२॥
रत्ना अंगी रत्नकीळ ।
नव्हती भिन्न अग्निज्वाळ ॥३॥
निळा म्हणे सांडुनि जळा ।
सागर न निवडे वेग्ळा ॥४॥