लवेमाजीं उत्पन्न एक । रक्तशोक पशुदेहीं ॥१॥ मांसाहारी जळाहारी । तृणाहारी फलभक्षी ॥२॥ कोठें धान्य भक्षूनि अन्नें । कोठें प्राशनें पवनाच्या ॥३॥ निळा म्हणे जन्म जेथें । रुचे तेथेंचि तया ॥४॥