लवेमाजीं उत्पन्न एक – संत निळोबाराय अभंग – ९३०
लवेमाजीं उत्पन्न एक ।
रक्तशोक पशुदेहीं ॥१॥
मांसाहारी जळाहारी ।
तृणाहारी फलभक्षी ॥२॥
कोठें धान्य भक्षूनि अन्नें ।
कोठें प्राशनें पवनाच्या ॥३॥
निळा म्हणे जन्म जेथें ।
रुचे तेथेंचि तया ॥४॥
लवेमाजीं उत्पन्न एक ।
रक्तशोक पशुदेहीं ॥१॥
मांसाहारी जळाहारी ।
तृणाहारी फलभक्षी ॥२॥
कोठें धान्य भक्षूनि अन्नें ।
कोठें प्राशनें पवनाच्या ॥३॥
निळा म्हणे जन्म जेथें ।
रुचे तेथेंचि तया ॥४॥