येऊनियां नरदेहा ।
कांहीं स्वहित तें पहा ॥१॥
नाहीं तरी व्यर्थ जन्म ।
चिंतीतसे विषयकाम ॥२॥
पशु विषय सेविती ।
तयापरी तुझी स्थिति ॥३॥
निळा म्हणे व्यर्थ गेला ।
प्राणि भूमिभार झाला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.