येथें येऊनि केलें कायी । विठ्ठल नाहीं आठविला ॥१॥ आहा रे मूढा भाग्यहीना । नेलासी पतना मोहभ्रमें ॥२॥ नाहीं केली सुटिका कांहीं । येचि प्रवाही पडिलासी ॥३॥ निळा म्हणे लाहोनि हातीं । केली माती आयुष्या ॥४॥