येथें येऊनि केलें – संत निळोबाराय अभंग – ९२८
येथें येऊनि केलें कायी ।
विठ्ठल नाहीं आठविला ॥१॥
आहा रे मूढा भाग्यहीना ।
नेलासी पतना मोहभ्रमें ॥२॥
नाहीं केली सुटिका कांहीं ।
येचि प्रवाही पडिलासी ॥३॥
निळा म्हणे लाहोनि हातीं ।
केली माती आयुष्या ॥४॥