याचे पायीं धरिल्या – संत निळोबाराय अभंग – ९२६
याचे पायीं धरिल्या भाव ।
भेटेल देव निश्चयें ॥१॥
नव्हे अन्यथा भाषण ।
ठावी खूण संतांसी हे ॥२॥
निजकरें कुरवाळून ।
देईल आलिंगन अत्यादरें ॥३॥
निळा म्हणे येईल दारा ।
देव सामोरा धांवोनिया ॥४॥
याचे पायीं धरिल्या भाव ।
भेटेल देव निश्चयें ॥१॥
नव्हे अन्यथा भाषण ।
ठावी खूण संतांसी हे ॥२॥
निजकरें कुरवाळून ।
देईल आलिंगन अत्यादरें ॥३॥
निळा म्हणे येईल दारा ।
देव सामोरा धांवोनिया ॥४॥