भुंकोनियां उठी । श्वान लागे भलत्या पाठीं ॥१॥ ऐसा देहस्वभावगुण । नेणे भला बुरा कोण ॥२॥ तैसाचि तो अतिवादी । अविवेकी सदा क्रोधी ॥३॥ निळा म्हणे ओळखी सांडी । आलें तैसें बरळें तोंडीं ॥४॥