भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥ दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥ सुहदजन ते अवमान करिती । निष्ठुर बोलती त्रासवंचनें ॥३॥ निळा म्हणे मग होय दैन्यवाणें । हो काय तैसें जिणें भूमिभार ॥४॥