भीड भीड जाय उडोनि – संत निळोबाराय अभंग – ९२३
भीड भीड जाय उडोनि लौंकिक ।
शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥
दावितां तो तोंड लाजे भरले सभे ।
मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥
सुहदजन ते अवमान करिती ।
निष्ठुर बोलती त्रासवंचनें ॥३॥
निळा म्हणे मग होय दैन्यवाणें ।
हो काय तैसें जिणें भूमिभार ॥४॥