भाविकाचा मनोभाव । पाववी देव सिध्दी हा ॥१॥ तेंचि सत्य बोलिलों बोलें । माझिया आलें स्वानुभावा ॥२॥ जाणें अंतरींचें आर्त । साक्षभूत सकळांचा ॥३॥ निळा म्हणे संदेह नाहीं । अनुमान कांहीं यदर्थी ॥४॥