भवाब्धीचें सखोल पाणी – संत निळोबाराय अभंग – ९२०
भवाब्धीचें सखोल पाणी ।
बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥
येथें उतार न दिसे कोणा ।
थोरा लहाना नागवण ॥२॥
सत्व कर्मे स्वर्गा जाती ।
तमें पडती अध:पातीं ॥३॥
निळा म्हणे रजतमात्मक ।
पावती लोक नरदेहा ॥४॥
भवाब्धीचें सखोल पाणी ।
बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥
येथें उतार न दिसे कोणा ।
थोरा लहाना नागवण ॥२॥
सत्व कर्मे स्वर्गा जाती ।
तमें पडती अध:पातीं ॥३॥
निळा म्हणे रजतमात्मक ।
पावती लोक नरदेहा ॥४॥