ऐसें केशियाचें हनन – संत निळोबाराय अभंग ९२
ऐसें केशियाचें हनन ।
केलें देखोनियां सकळ जन
गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती
न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥
कृत्रिम वेषिया तुरंगम ।
आला इच्छूनियां सग्राम ।
कैसा जाणूनियां मेघ:शाम ।
तयावरी सरसावला ॥२॥
त्याची केलीचि कार्यसिध्द ।
तोडूनियां आधिव्याधि ।
बैसविला तो सभासंधी ।
मुक्तिस्थानीं मुक्ताचियें ॥३॥
वार्ता गेली कंसासुरा ।
मर्दिलें केशिया महावीरा ।
गोकुळी आनंद नारीनारां ।
हषें साखरा वांटिती ॥४॥
कंस म्हणे विपरीत भाग्य ।
झालें ओढवलें उपसर्ग ।
गेले माझे हे अंगलग ।
आतां विश्वास कोणाचा ॥५॥
गगनवाणी ऐकियेली जेव्हां ।
सुत देवकीचा आठवा ।
तोचि वधील दैत्यां सर्वां ।
तों हें विपरीत वर्तलें ॥६॥
गोकुळामाजीं तुझा वैरी ।
नाहीं ऐकिलें भविष्यांतरी ।
एकचि वदली ते कुमारी ।
जें कां निष्ठिली हातींची ॥७॥
व्यर्थचि पिडियेली देवकी ।
आणि वसुदेवही पुण्यश्रलोकी ।
होणार न चुकेचि कीं सेखीं ।
विघ्न आणिकचि उदेलें ॥८॥
निळा म्हणे ऐसियापरी ।
कंस निमग्न दु:खसागरीं ।
गेली ऐश्रवर्याची धारी ।
पडिला शरीरीं निचेष्टित ॥९॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.