भलते वेळे भलतेंचि करी । निर्भीड सर्वदा अंतरीं ॥१॥ न म्हणे कर्म हें निषिध्द । आलें मना तेंचि शुध्द ॥२॥ लाजेचा पेंडोळा । खाणोनि सांडिला निराळा ॥३॥ निळा म्हणे अवाच्य बोले । छंदे आपुलियाचि डोले ॥४॥