ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ ॥१॥ हे तों यातिस्वभावगुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥ अवघे ठायीं पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥३॥ निळा म्हणे गुणवांटणीं । योगी विभाग चहूं वर्णी ॥४॥