ब्राम्हण सोंवळाचि सर्व – संत निळोबाराय अभंग – ९१८
ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ ।
वसे अनामिकीं विटाळ ॥१॥
हे तों यातिस्वभावगुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥
अवघे ठायीं पंचभौतिक ।
आत्मा सकळां व्यापक एक ॥३॥
निळा म्हणे गुणवांटणीं ।
योगी विभाग चहूं वर्णी ॥४॥