नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत ॥१॥ कर्माकर्में लागलीं पाठीं । बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥ सत्यचि परि तें असत्य वाटे । भोगिती उदृष्टें आपुलालीं ॥३॥ निळा म्हणे कर्मतंत्रीं । गुंतलीं यंत्रीं मायेच्या ॥४॥