दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥ तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥ पुढिलांचे उत्तम गुण । ऐकोनियां उत्थापन करुं धांवे ॥३॥ निळा म्हणे यातना त्यासी । केवीं नर्कावासीं नव्हती सांगा ॥४॥