त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥ जैसी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥२॥ उत्तम मध्यम अधम भेद । जाणती विशद जाणते ॥३॥ निळा म्हणे आपुलाल्या परी । उमटती अंतरी भाव भिन्न ॥४॥