तेचि माझे सर्वसाक्षी । आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥ काय केलें इतरां जनां । भरली भावना त्रिविधा ॥२॥ ठावें ज्याचें तया वर्म । आणिकां दुर्गंम जाणतियां ॥३॥ निळा म्हणे व्याली जाणे । वांझें वायाणें तिडकांचें ॥४॥