तेचि माझे सर्वसाक्षी – संत निळोबाराय अभंग – ९१३
तेचि माझे सर्वसाक्षी ।
आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥
काय केलें इतरां जनां ।
भरली भावना त्रिविधा ॥२॥
ठावें ज्याचें तया वर्म ।
आणिकां दुर्गंम जाणतियां ॥३॥
निळा म्हणे व्याली जाणे ।
वांझें वायाणें तिडकांचें ॥४॥