ठायीं मीचि नाहीं म्हणें । हारपलों भ्रांतिगुणें ॥१॥ लोकां म्हणे धांवा धांवा । मज अपणा भेटवां ॥२॥ प्रभा सूर्यातें गिवसि । गोडी पुसे साखरेसी ॥३॥ निळा म्हणे लहरी सिंधु । भेटावया करी खेदू ॥४॥