पापासवें जिणें ज्याचें । वृथाचि त्याचें झालेपण ॥१॥ भोगितां भोग रडे मग । म्हणे मी जगनिंदय झालों ॥२॥ सांगतां हित नाहीं एकिलें । वडिलीं दाविलें विहित तें ॥३॥ निळा म्हणे आतां पडियेला खोळे । गिळियला काळें व्याधिसर्पे ॥४॥