पदार्थ मात्र पाहों जातां । प्रगटे अवचिता त्यामाजीं ॥१॥ ऐसा वेध लाविला मना । विसरों आपणा नेदीचि ॥२॥ सुख विपत्ति भोगितां भोग । वोडवी अंग आपुलेंचि ॥३॥ निळा म्हणे ठावोचि रिता । नेदी हा सर्वथा राहों पुढें ॥४॥