पदार्थ मात्र पाहों – संत निळोबाराय अभंग – ९०९
पदार्थ मात्र पाहों जातां ।
प्रगटे अवचिता त्यामाजीं ॥१॥
ऐसा वेध लाविला मना ।
विसरों आपणा नेदीचि ॥२॥
सुख विपत्ति भोगितां भोग ।
वोडवी अंग आपुलेंचि ॥३॥
निळा म्हणे ठावोचि रिता ।
नेदी हा सर्वथा राहों पुढें ॥४॥