नेणोनिया आपपर । करी भलत्यासवें वैर ॥१॥ वावदूक ते काजेंविण । तोडूनी सांडी सविधान ॥२॥ सर्व काळ अविवेक । करुनी प्रस्तावे बाधक ॥३॥ निळा म्हणे भोगीं फळें । दु:खाचींच प्राचीनबळें ॥४॥