नेणोनिया आपपर – संत निळोबाराय अभंग – ९०७
नेणोनिया आपपर ।
करी भलत्यासवें वैर ॥१॥
वावदूक ते काजेंविण ।
तोडूनी सांडी सविधान ॥२॥
सर्व काळ अविवेक ।
करुनी प्रस्तावे बाधक ॥३॥
निळा म्हणे भोगीं फळें ।
दु:खाचींच प्राचीनबळें ॥४॥
नेणोनिया आपपर ।
करी भलत्यासवें वैर ॥१॥
वावदूक ते काजेंविण ।
तोडूनी सांडी सविधान ॥२॥
सर्व काळ अविवेक ।
करुनी प्रस्तावे बाधक ॥३॥
निळा म्हणे भोगीं फळें ।
दु:खाचींच प्राचीनबळें ॥४॥