नीच यातीसीं संगती । आवडे ज्या अहोरातीं ॥१॥ तोचि ओळखावा दोषी । दुराचारी पापराशी ॥२॥ नेणें आपुला विधिधर्म । करी मना आलें कर्म ॥३॥ निळा म्हणे नर्कंवासीं । करी घालुनी पूर्वजांसीं ॥४॥