नाही विठोबाचें प्रेम । गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥ काय करिती आपुल्या दैवा । भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥ भरावें पोट हेंचि जाणती । नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥३॥ निळा म्हणे गिळिलें कर्मे । पुढें मरणजन्में अनिवारें ॥४॥