नाही विठोबाचें प्रेम – संत निळोबाराय अभंग – ९०५
नाही विठोबाचें प्रेम ।
गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥
काय करिती आपुल्या दैवा ।
भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥
भरावें पोट हेंचि जाणती ।
नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥३॥
निळा म्हणे गिळिलें कर्मे ।
पुढें मरणजन्में अनिवारें ॥४॥