नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥२॥ पावोनि उत्तम तनु नरदेहा ऐशी । बहु वेळां आयुष्यासी नासियलें ॥३॥ निळा म्हणे अधमा हिंडोनि नाना योगी । त्रास नुपजे मनीं अझून कैसा ॥४॥