नाहीं वारी पळमात्र – संत निळोबाराय अभंग – ९०४
नाहीं वारी पळमात्र घडी ।
गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥
आतां कधीं मोकळा होसी ।
मग या पावसी परमार्था ॥२॥
पावोनि उत्तम तनु नरदेहा ऐशी ।
बहु वेळां आयुष्यासी नासियलें ॥३॥
निळा म्हणे अधमा हिंडोनि नाना योगी ।
त्रास नुपजे मनीं अझून कैसा ॥४॥