न वाटें हें सांगतां खरें । न येतां बरें स्वानुभवा ॥१॥ बुध्दि मलीन झाली कामें । संसारभ्रमें मन वेडें ॥२॥ कैसेन येईल हें प्रतीति । विश्वास चितीं नुपजतां ॥३॥ निळा म्हणे खरें कुडें । दृष्टी निवडें पारखिया ॥४॥