नाना मतांतरें शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥ माझया विठोबाचे वर्म आहे दुरी । कैची तेथें उरी देहभावा ॥२॥ यज्ञ योग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान ऐलाडीं तें ॥३॥ निळा म्हणे विषयीं उपरती चित्ता । व्हावी सप्रेमता आवडीची ॥४॥