न सांपडे ऐसी कधीं ।
वेळ लागली ते संधी ॥१॥
हरिचे गुण वाचे यावे ।
श्रवणीं श्रवण ते करावे ॥२॥
गेलीं जातील वर्षे काळ ।
आयुष्या वेंचूनियां निर्फळ ॥३॥
निळा म्हणे यालागीं करा ।
वेगें आतां चित्तीं धरा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.