अश्वरुपिया केसासूर – संत निळोबाराय अभंग ९०
अश्वरुपिया केसासूर ।
ठाणमाण अति सुंदर ।
जैसा उच्चैश्रवा रहंवर ।
देवलोकीं इंद्राचा ॥१॥
शोभिवंत तयाहुनी आगळा ।
असुई अवलोकितां डोळा ।
पाहावाचि ऐसा वेळोवेळां ।
आठवों नेदी आणि ॥२॥
शोधितांही सप्तव्दीपांतरु ।
नाढळेचि कोठें ऐसा वारु ।
सुंदराहुनी अति सुंदरु ।
रुपें नागरु भुलवणा ॥३॥
दांडिमान कळाव्या डोळे ।
कर्ण जैसे केतकिदळें ।
गुडघे सुंब मेजागळे ।
सर्वहि शृंगारमंडीत ॥४॥
खोगिर जीन लगाम तोंडी ।
इलाखे रिकेबियांची जोडी ।
गाशा वागदोर दुमाचिया दांडी ।
खुरुस नवरत्न खचितांचे ॥५॥
तंव संवगडियांसी खेळत ।
आले अकस्मात गोपिनाथ् ।
वारु देखोनि गडिया म्हणत ।
पैल पहारे विचित्र तेजी ॥६॥
आम्हा राये कंसासुरें ।
बैसावया अति आदरें ।
धडिलें हें वहान खरें ।
अनुवादिजे गडियासी ॥७॥
आतां यावरी घालुनि स्वारी ।
पाहो बैसोनियां दुरी ।
बैसोनि पहावें गोपुरावरी ।
ऐसें सांगोनियां श्रीहरी ।
मग सांवरी आपणिया ॥९॥
आइता साज आहे वरी ।
रुपाकृत ही साजिरी ।
मायावी हा जाणेनियां हरी ।
कास कसिली बळकट ॥१०॥
निळा म्हणे मनोगत ।
आर्त केशियाचे उत्कंठित ।
वरी बैसलिया कृष्णनाथ ।
नेईन दिगांता उडवुनी ॥११॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.