ज्याचें देणें त्याचें नाम । गावें प्रेम धरुनियां ॥१॥ नाहीं तरी घडती दोष । अंगी नि:शेष कृतघ्रता॥२॥ पिंड वाढें ज्याच्या अन्नें । त्याचेचि वानें वाढवावें ॥३॥ निळा म्हणे माझे दाते । सरते पुरते संतजनीं ॥४॥