ज्याचें अंतर तया ठावें । उमटेल बाहेरीं क्रियाभावें ॥१॥ म्हणोनियां धीर करा । माजिघरींचें येईल दारा ॥२॥ नव्हे आघातुरडा खेळ । सत्ता ज्याची त्याचें बळ ॥३॥ निळा म्हणे आहे धणी । शिरीं संपन्न सर्वो गुणीं ॥४॥