ज्याचें अंतर तया ठावें – संत निळोबाराय अभंग – ८९७
ज्याचें अंतर तया ठावें ।
उमटेल बाहेरीं क्रियाभावें ॥१॥
म्हणोनियां धीर करा ।
माजिघरींचें येईल दारा ॥२॥
नव्हे आघातुरडा खेळ ।
सत्ता ज्याची त्याचें बळ ॥३॥
निळा म्हणे आहे धणी ।
शिरीं संपन्न सर्वो गुणीं ॥४॥